नंदुरबार जिल्हात पुन्हा 15 दीवसांसाठी लॉकडाऊन.

नंदुरबार जिल्हात पुन्हा 15 दीवस लॉकडाऊन :



नंदुरबार कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत  पुर्णत: संचारबंदी करण्याचे जिल्हाधिकारी IASRajBharud  यांचे निर्देश. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार.

काय राहणार बंद :

सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार,अत्यावश्यक नसलेली दुकाने,  शॉपींग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स,बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, करमणुक उद्याने,सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रिडा संकुले , मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेंम्ब्ली हॉल बंद.


हॉटेल, लॉजिंग,परमिट रूम बियरबार,सर्व प्रकारच्या आस्थापना  बंद. सामाजिक, राजकीय, धार्मिक,क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने बंद. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, धर्मगुरु, पुजारी यांना नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील.

काय राहणार सुरू :

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पुर्णवेळ सुरू.  भाजीमंडई सकाळी 6 ते 11 या वेळेत सुरू राहील, मात्र एका आड एक ओटे राहतील. दुध वितरकांना सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत दुध वितरणास परवानगी, तहसिलदार यांचेकडून ओळखपत्र घेणे आवश्यक .


एमपीएससी व मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा  यांना परीक्षा कामकाजासाठी मुभा राहील. परिक्षार्थींनादेखील मुभा राहील, तथापि त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक .

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू :

गॅस वितरण पूर्णवेळ सुरू. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी सुरू राहतील.अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तींना अनुमती असणार नाही. वृत्तपत्र कार्यालये आणि वृत्तपत्र छपाई व वितरणास अनुमती.

किराणा आस्थापना सकाळी 6 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी.पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील. दुकानाच्या समोरील बाजूस ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा फलक लावावा.सर्व प्रकारची माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी .

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण संस्था 27 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षणास अनुमती.


Comments

Popular posts from this blog

Indian Navy Agniveer Recruitment 2025

NHM Nandurbar Recruitment 2024 of 142 Medical Officer Posts: Apply Now

Central Railway Pune Recruitment 2021 | CR Pune Bharti 2021-18 Medical Practioners Posts.