नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन
पुढच्या 24 तासात विशेषतः संध्याकाळी वर रात्रीच्या वेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गारपीट आणि प्रचंड वादळ येण्याची शक्यता आहे
नंदुरबार | जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढच्या 24 तासात विशेषतः संध्याकाळी वर रात्रीच्या वेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गारपीट आणि प्रचंड वादळ येण्याची शक्यता आहे.
या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, रात्रीच्या वेळी वादळामुळे मातीची घरे व पत्रे पडू न जाण्याची किंवा झाडे कोसळण्याची शक्यता आहे. तसेच छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयीच थांबण्याचे आदेश दिले आहे, दुपारी तीन नंतर सर्व दुकाने, शॉपिंग मार्केट बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. दुर्घटना घडल्यास पाहायला जाऊ नये शक्यता एकमेकांना सहकार्य करा घाबरू नका दक्षता घ्या असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी जनतेला केले आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your response